International Yoga Day - 21 June, 2019

औरंगाबाद, दि.२१ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्याथ्र्यांनी योग दिनानिमित्त हसत खेळत योगाचे धडे घेतले. आजच्या धक्काधकीच्या जीवनात शारीरिक व्याधी बरोबरच मानसिक ताणतणाव वाढले असून योगासन ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ.देवानंद शिंदे यांनी केले.
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जागतिक योग दिनानिमित्त  शुक्रवारी (दि.२१) सकाळी ७ ते ८ या दरम्यान योग शिबीर घेण्यात आले. योगशास्त्र, क्रीडा विभाग, विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने  क्रीडा विभागाच्या बॅडमिटन हॉल येथे हे योग शिबिर झाले. यावेळी कुलगुरु डॉ.देवानंद शिंदे म्हणाले, योग ही नियमित करण्याची प्रक्रिया असून शारीरिक, मानसिक, बौध्दिक, वैचारिक आणि भावनिक पातळीवर संतुलित राहण्यासाठी योग आवश्यक आहे. कुलसचिव डॉ.साधना पांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.पुâलचंद सलामपुरे, डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.संजय साळुंखे, डॉ.गणेश मंझा यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरासाठी डॉ.मुस्तजिब खान, डॉ.टी.आर.पाटील, डॉ.जयंत शेवतेकर व डॉ.सोनाली क्षीरसागर यांच्यासह कर्मचा-यांनी प्रयत्न केले. जवळपास एक तास विविध प्रकारचे आसने करण्यात आली. यामध्ये ताडासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, वृक्षासन, पादहस्तासन, भद्रासन, वज्जासन, अर्ध उष्ट्रासन, उष्ट्रासन, शशांकासन, उत्तान मण्डूकासन, वक्रासन, भुजंगासन, मकरासन, शलभासन, सेतुबंधासन, उत्तान पादासन, अर्धहलासन, पवनमुक्तासन, शवासन, कपालभाती, शीतली आणायाम, भ्रामरी प्राणायाम, ध्यानमुद्रा आदी आसने करण्यात आली. यावेळी योगशास्त्र विभागाच्या विद्याथ्र्यांनी प्रात्यक्षिक सादर केले.