अण्णाभाऊंचे विचार सामान्यापर्यंत पोहोचवा : मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांचे आवाहन

औरंगाबाद, दि.१८ :  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे ख-या अर्थाने उपेक्षितांचे नायक आहेत. त्यांचे विचार सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्याचे काम अण्णाभाऊ साठे अध्यासन वेंâद्राने केले पाहिजे, असे प्रतिपादन मा.कुलगुरु डॉ.प्रमोद नवले यांनी केले.
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन वेंâद्रातर्पेâ अण्णाभाऊ साठे स्मृतिदिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. महात्मा पुâले सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी अभ्यासक जालिंदर कांबळे यांचे ‘साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जीवन वाड:मय व विचार‘ या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले होते. व्यासपीठावर कुलसचिव डॉ.साधना पांडे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, वित्त व लेखाधिकारी राजेंद्र मडके, अधिसभा सदस्य प्रा.संजय गायकवाड, डॉ.दिलीप अर्जूने, उपकुलसचिव डॉ.दिगंबर नेटके, संचालक डॉ.संजय सांभाळकर आदी उपस्थित होते. यावेळी जालिंदर कांबळे म्हणाले, शून्यातून विश्व निर्माण करण्याचे कार्य अण्णाभाऊंनी आयुष्यात केले. दारिद्रयात सुरुवात केलेलेल्या अण्णाभाऊंनी जगाला विचार देण्याचे काम केले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढयाची ज्योत पेटवली. दुसरा स्वातंत्र्य लढा लढला. गिरणी कामगारांसाठी लढा दिला. आपल्या शाहिरीच्या जोरावर शोषित, वंचित, पीडितांचे प्रश्न मांडले. आपल्या कारकिर्दीत ४२ कादंब-या लिहिल्या. २१ कथासंग्रह प्रकाशित केले. पोवाडयांची रचना केली. अशिक्षित व्यक्तीने अफाट साहित्य निर्मिती केल्याचे हे जगातील एकमेव उदाहरण असेल, अशा साहित्य सम्राटांचे विचार प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजेत, असेही कांबळे म्हणाले. अध्यक्षीय समारोपात कुलगुरु डॉ.येवले म्हणाले, कुलगुरुपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अण्णाभाऊंच्या स्मृतिदिनानिमित्त पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात सहभागी होता आले, हा आनंदाची दिवस आहे. अण्णाभाऊंचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यत पोहोचविण्याचे कार्य अध्यासन वेंâद्राने केले पाहिजे. त्यासाठी लागणारी आवश्यक ती मदत करण्यास तयार असल्याचेही मा.कुलगुरु यांनी स्पष्ट केले आहे.

Comments are closed