‘मॉडेल कॉलेज‘ला राज्यात आदर्श बनवू : मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांचा विश्वास

औरंगाबाद, दि.३० : घनसावंगी येथील मॉडेल कॉलेजची इमारत अद्ययावत व सर्वसुविधांनी युक्त आहे. या ठिकाणी उत्तम दर्जाच्या भौतिक, पायाभूत सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन ‘मॉडेल‘ला राज्यातील एक आदर्श महाविद्यालय म्हणून नावलौकिक मिळवून देऊ, असा विश्वास मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केला.
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्पेâ चालविण्यात येत असलेल्या घनसावंगी मॉडेल कॉलेजला मा.कुलगुरु यांनी मंगळवारी (दि.२३) भेट देऊन पाहणी केली तसचे शिक्षक, विद्याथ्र्यांशी संवाद साधला. या ठिकाणी कला, विज्ञान व वाणिज्य पदवी अभ्यासक्रमात एकुण ७७० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जालना जिल्हयातील उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून हे नावारुपाला येत आहे. या पाश्र्वभुमीवर कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी पदभार स्विकारल्यानंतर या परिसराला भेट दिली. प्रारंभी प्राचार्य डॉ.विश्वास कदम यांनी स्वागत करुन महाविद्यालयातील अभ्यासक्रम, विद्यार्थी संख्या, वेळापत्रक, उपक्रम याबददल माहिती दिली. तर कार्यकारी अभियंता  रविंद्र काळे यांनी या ठिकाणी करण्यात आलेले ईमारतीचे बांधकाम, पायाभूत सुविधा करुन दिल्याची माहिती दिली. यामध्ये १४ वर्गखोल्या, १३ प्रयोगशाळा, संगणक लॅब, प्राचार्य कक्ष, स्टाफ रुम, महिला कक्ष आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी मा.कुलगुरु यांनी शिक्षक, विद्याथ्र्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, २०१२-१३ या शैक्षणिक वर्षापासून सदर महाविद्यालय सुरु आहे.या ठिकाणी उत्तम ईमारत निर्माण झाली आहे. नौकरी व उद्यागाभिमूख अभ्यासक्रम या ठिकाणी राबविण्यात येत आहे. हे कॉलेज राज्यामध्ये सर्वोत्कृष्ट  बनविण्यात येईल, असेही मा.कुलगुरु म्हणाले.
    विद्यार्थी वेंâद्रबिदू ठेवून वि़द्याथ्र्यांना सर्व प्रकारच्या सोईसुविधा पुरवण्यात येतील, असे म्हटले. विद्याथ्र्यांनीसाठी बस सुविधा, मोफत वसतीगृह सुविधा, महाविद्यालयातील सर्व विषयाच्या प्रयोगशाळा अद्यायावत करण्यात येतील तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी गुणवत्ताप्राप्त असून त्यांच्या ज्ञानाचा कौशल्याचा विद्याथ्र्यांनी सदुपयोग करुण घ्यावा असेही आव्हानही केले विद्याथ्र्यांनी  या स्पर्धेच्या युगात स्वत:ला सिध्द करण्यासाठी कठोर परिश्रम घेऊन यशाचे शिखर गाठले पाहिजे तसेच प्राध्यापकांशी संवाद साधतांना ते म्हणाल, असेही ते म्हणाले. आजचा शिक्षक हा संशोधनातुन ओळखला जावा आपल्या अध्यापन विषयामध्ये सखोल अभ्यास करुन विद्याथ्र्यांना आवड निर्माण होईल विद्याथ्र्यांच्या मनामध्ये कुठलाही न्युनगंड राहु नये यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजेत, असेही मा.कुलगुरु म्हणाले.

Comments are closed